बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

संतप्त हिंदूंच्या मोर्चावर सत्ताधारी पक्षाच्या संघटनांकडून आक्रमण : ५ हिंदू घायाळ

खासदार बहउद्दीन बहार

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील कोमिला शहरातील नजरूल अ‍ॅव्हेन्यू या भागात सत्ताधारी अवमी लीगचे खासदार बहऊद्दीन बहार यांच्या विरोधात हिंदूंकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यावर आक्रमण करण्यात आले. यात ५ हिंदू घायाळ झाले. यात एकाची स्थिती चिंताजनक आहे. ‘छात्र लीग’ आणि ‘जुबो लीग’ या इस्लामी कट्टरतावाद्यांकडून हे आक्रमण करण्यात आले. खासदार बहार यांनी दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख केला होता. त्या विरोधात हिंदूंनी येथे मोर्चा काढला होता. या मोर्च्याचे आयोजन बांग्लादेश युवा एकता परिषद, हिंदु-बौद्ध-ईसाई एकता परिषद  छात्र एकता परिषद आणि महिला एकता परिषद यांनी केले होते. आक्रमण करणार्‍यांपैकी ‘छात्र लीग’ ही संघटना पंतप्रधान शेख हसीनी यांच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाची विद्यार्थी संघटना आहे, तर ‘जुबो लीग’ ही याच पक्षाची युवा संघटना आहे.

१. हिंदु-बौद्ध-ईसाई एकता परिषदेचे सरचिटणीस राणा दास गुप्ता यांनी सांगितले की, बहार यांनी म्हटले होते की, जर मद्याची विक्री अल्प केली, तर दुर्गापूजा मंडपांची संख्या अल्प होईल. बहार यांनी २ वेळा दुर्गापूजेचा संबंध मद्याशी जोडला.

२. काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील मुंशीगंजचे महापौर फैसल यांनी हिंदु खासदार श्री. मृणाल कांति दास यांना ‘मलौं’ (हिंदूंसाठीचे अपमानस्पद शब्द), ‘नोपुंगशाक’ (नपुंसक) आणि ‘चांडाळ’ असे म्हटले होते.

संपादकीय भूमिका 

  • पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !
  • बांगलादेशाची निर्मिती भारतामुळे झाली असतांना तेथे हिंदूंचाच वंशसंहार होत आहे आणि भारतीय शासनकर्ते काहीच करत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !
  • इस्लामी देशांची संघटना जगात मुसलमानांच्या विरोधात काही झाले, तर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करते, भारत असे कधी करणार ?