ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या संबंधित कट्टरतावादी गटाने रथींद्र नाथ रॉय या हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी बेकायदेशीररित्या कह्यात घेतली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही घटना हितबंध उपजिल्ह्यातील पारूलिया गावातील आहे. धर्मांधांकडून या कुटुंबाला धमकी देण्यासह त्यांच्यावर आक्रमण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Some local ruling party men have allegedly grabbed eight acres of land belonging to a minority Hindu family in #Hatibandha upazila.#Bangladesh https://t.co/9zj50CKAGi
— The Daily Star (@dailystarnews) December 27, 2023
१. येथील ‘द डेली स्टार’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भूमीवर नियंत्रण मिळवणार्यांमध्ये अवामी लीगचा नेता हफीजुल इस्लाम, अबुल कलाम, हजरत अली आणि रेदवान अहमद यांचा समावेश आहे. हफीजुल हा पतिकपारा प्रभागाचा अध्यक्ष आणि अबुल सरचिटणीस आहे.
२. पोलीस अधिकारी शाह आलम यांनी सांगितले की, आमच्याकडे भूमीवर अवैध नियंत्रण मिळवल्याची तक्रार आली आहे. हे भूमीविषयीचे प्रकरण असल्याने स्थानिक स्तरावर सोडवण्यासाठी पतिकापरा युनियन परिषदेच्या अध्यक्षांना सांगण्यात आले आहे.
३. परिषदेचे अध्यक्ष मजीबुल आलम यांनी म्हटले की, रथींद्र रॉय यांच्या तक्रारीची चौकशी करून ती खरी असेल, तर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी सत्ताधारी अवामी लीग सरकारच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी जवळचे संबंध आहेत. तरीही त्यांच्या देशात सत्तेवर असणार्या त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक ! |

Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता