India Australia : विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर बांगलादेशात जल्लोष !

इस्लामी देशांचा भारतद्वेष उघड करणारी घटना !

ढाका (बांगलादेश) – १९ नोव्हेंबर या दिवशी कर्णावतीतील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला. यामुळे बांगलादेशात मुसलमान नागरिकांनी एकच जल्लोष केला.

बांगलादेशातील ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात संपूर्ण बांगलादेश भारताचा पराभव साजरा करत असल्याचे सांगण्यात आले आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यात अनेक बांगलादेशी तरुण ‘भारत नोकर भारत नोकर’ अशा प्रकारे ओरडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने यासंदर्भात ‘एक्स’वरून हा व्हिडिओ प्रसारित करून ‘बीसीसीआय’, म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला उद्देशून म्हटले आहे, ‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’

व्हिडिओमध्ये बांगलादेशी मुसलमान म्हणत आहेत की, भारताचा पराभव झाल्याने आम्हाला पुष्कळ आनंद होत आहे. एक व्यक्ती म्हणतांना दिसत आहे की, भारत हरल्याने आज मला शांत झोप लागेल. अन्य एक व्यक्ती म्हणत आहे की, जेव्हा ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चौके मारत होते, तेव्हा असे वाटत होते की, बांगलादेशचा खेळाडू शाकीब अल् हसनच चौकार मारत आहे.