Bangladesh BoudhMath On Fire :बांगलादेशात १५० वर्षे जुना बौद्ध मठ जाळण्याचा प्रयत्न !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामधील कॉक्स बाजार जिल्ह्यातील चेरनघाटा भागात असणारा १५० वर्षे जुना बौद्ध मठ जाळण्याचा प्रयत्न एका व्यक्तीकडून करण्यात आला. त्याने लावलेल्या आगीमध्ये या मठाचा लाकडी जिना जळून नष्ट झाला. स्थानिकांनी तत्परतेने अग्नीशमन दलाला बोलावले. त्यामुळे लगेच आग आटोक्यात येऊन मोठी हानी टळली. ही घटना ५ जानेवारीच्या रात्री घडली. पोलीस आग लावणार्‍या व्यक्तीचा शोध घेत आहे. ही आग ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी लावल्याचा आरोप सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका 

इस्लामी देशांत अन्य धर्मियांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होतात, हे नवीन नाही. बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?