|

ढाका (बांगलादेश) – बांग्लादेशच्या चटगाव येथील हथजारी येथील सोमपुरा क्षेत्रात वास्तव्य करणारा शाह आलम याने दुर्गापूजेच्या मंडपामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा संशय आल्याने पूजा समितीच्या सदस्यांनी त्वरित त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आलमजवळ कुराणाच्या प्रतींनी भरलेली एक बॅगही होती. ३ घंट्यांनी आलम हा मनोरुग्ण असल्याचे सांगत पोलिसांनी त्याला सोडून दिले. (भारत असो किंवा बांगलादेश हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करणारे धर्मांध नेहमीच मनोरुग्ण कसे असतात, हे एक मोठे कोडे आहे ! – संपादक) ही बातमी सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्याचे पाहून पोलिसांनी रात्री २ वाजता आलमला पुन्हा कह्यात घेतले.
सोमपुरा क्षेत्रात असलेल्या श्रीश्री रक्षाकाली मंदिरात ही घटना २१ ऑक्टोबर या दिवशी घडली. या वेळी हिंदूंनी म्हटले की, पोलिसांनी कोणतेच अन्वेषण न करता शाह आलम हा मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले. पूजा समितीच्या सदस्यांनी आरोप केला आहे की, आलम काहीतरी गडबड करण्यासाठी दुर्गापूजेच्या मंडपामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील असुरक्षित हिंदूंची व्यथा समाप्त होण्यासाठी भारतात प्रभावी हिंदूसंघटन आवश्यक ! |
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !