SaudiArabia Records Execution In 2024 : सौदी अरेबियाने एका वर्षात ३०३ जणांना दिली फाशी !

रियाध – इस्लामी देश सौदी अरेबियाने फाशीच्या शिक्षेचे सर्व विक्रम मोडले आहेत. वर्ष २०२४ मध्ये देशात फाशी दिलेल्या लोकांची संख्या डिसेंबरच्या प्रारंभी ३०० च्या पुढे गेली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. ३ डिसेंबर या दिवशी सौदी अरेबियाने अमली पदार्थांची तस्करी आणि हत्या या प्रकरणी दोषी ठरलेल्या ३ पुरुषांना फाशी दिली. त्यामुळे या वर्षी आतापर्यंत फाशीची संख्या ३०३ झाली आहे.

१. सौदी माध्यमांच्या वृत्तानुसार सप्टेंबरमध्ये २०० लोकांना फाशी देण्यात आली. यांमध्ये अमली पदार्थांशी संबंधित आरोपांमध्ये दोषी ठरलेल्या १०३ जणांचा आणि आतंकवादाच्या आरोपांमध्ये दोषी ठरलेल्या ४५ जणांचा समावेश आहे.

२. एका नवीन प्रकरणात सौदी अरेबियाच्या न्यायालयाने एका भारतीय व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तरप्रदेशातील मेरठचा रहिवासी असलेल्या झैद जुनैद याला अमली पदार्थांच्या तस्करीसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. झैद जुनैद याला मादक पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली मक्का येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

भारतात काही प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली जाते; मात्र त्याची कार्यवाही होत नाही. सौदी अरेबियाकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे !