रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा ट्रम्प यांना दूरभाष
वॉशिंग्टन (अमेरिका) – डॉनल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याच्या २ दिवसांनंतर, म्हणजे ७ नोव्हेंबर या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना दूरभाष केला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये शांतता राखण्याविषयी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प यांनी पुतिन यांना ‘युक्रेन युद्ध आणखी वाढवू नका’, असा सल्ला दिला. यासह त्यांनी युरोपमध्ये अमेरिकी सैन्याच्या उपस्थितीची आठवण करून दिली. या वेळी पुतिन यांनी रशिया अमेरिकेशी चर्चेसाठी सिद्ध असल्याचे सांगितले. या वेळी दोन्ही नेत्यांनी युरोपमध्ये शांतता राखण्याविषयीही चर्चा केली; मात्र या संभाषणाला अमेरिका किंवा रशिया यांनी दुजोरा दिलेला नाही.
एका वृत्तावाहिनीशी बोलतांना ट्रम्प म्हणाले की, निवडणुकीत विजय मिळाल्यापासून त्यांनी ७० देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांचाही समावेश आहे.