अंत्यसंस्कारासाठी नोंद न करता मुसलमानांना थोडी भूमी दिल्यानंतर सर्व १३.८ एकर भूमीला ‘वक्फ संपत्ती’ केले घोषित !
विजयपुरा (कर्नाटक) – जिल्ह्यातील होनटगी गावात एका हिंदु कुटुंबाने मुसलमान समुदायाच्या लोकांना थोडी भूमी दिली होती. याचा अपलाभ उठवत वक्फ बोर्डाने त्या हिंदु कुटुंबाची संपूर्ण भूमी वक्फ संपत्ती म्हणून नोंदवली आहे. यामुळे शेतकर्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला असून सरकारकडे तक्रार केली आहे.
होनटगी गावातील सुरेश तेरेदाळ आणि त्यांचे कुटुंबीय यांनी मुसलमान समुदायाच्या लोकांना अंत्यसंस्कारासाठी कोणत्याही नोंदणीत नमूद न करता वापरासाठी भूप्रदेश दिला होता, पण वापरासाठी दिलेल्या जागेला वक्फ संपत्ती म्हणून नोंदवण्यात आले, तसेच सुरेश तेरेदाळ यांच्याकडील १३.८ एकर भूमीसुद्धा वक्फ संपत्ती म्हणून दर्शविण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘वक्फ कायद्या’ला आता प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हिंदूंनो, केंद्र सरकारला जनभावनेचा विचार करून वक्फ बोर्ड विसर्जित करावाच लागेल, अशी तुमची पत निर्माण करा ! |