Canadian MP On Khalistani Extremism : आम्ही दीर्घकाळापासून खलिस्तानी कट्टरतावादाशी लढत आहोत !

कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांची टीका

कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य

ओटावा (कॅनडा) : कॅनडा खलिस्तानी कट्टरतावादाशी दीर्घकाळ संघर्ष करत आहे आणि कॅनडाच्या प्रशासनालाही या समस्येचे गांभीर्य समजते. कॅनडाचे सार्वभौमत्व महत्त्वाचे असून परदेशातून होणारा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी दिली आहे.

‘एक्स’वर पोस्ट करत चंद्रा आर्य यांनी म्हटले की, २ आठवड्यांपूर्वी कॅनडा  पोलिसांनी सुरक्षा पुरवली, तेव्हाच मी एडमंटनमध्ये आयोजित हिंदूंच्या कार्यक्रमात सुरक्षितपणे सहभागी होऊ शकलो.

खलिस्तानी आंदोलकांच्या एका गटाने माझ्या विरोधात निदर्शने केली. कॅनडामध्ये खलिस्तानी कट्टरतावादाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनीही राष्ट्रीय कृती दल सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. कट्टरतावाद आणि आतंकवाद हे देशाच्या सीमेपुरते मर्यादित नाहीत, हे आपण जाणता. मला आशा आहे की, आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा पूर्ण गांभीर्याने अन्वेषण करतील.