Bhilwara Chopped Cow Tail : भिलवाडा (राजस्‍थान) येथे मंदिराबाहेर टाकण्‍यात आली गायीची शेपटी

  • शहरामध्‍ये हिंदूंकडून उपोषणाद्वारे आंदोलन

  • पोलिसांकडून लाठीमार

हिंदूंकडून उपोषणाद्वारे आंदोलन

भिलवाडा (राजस्‍थान) – येथील एका मंदिराबाहेर २५ ऑगस्‍ट या दिवशी गायीची कापलेली शेपटी सापडल्‍याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या वेळी जमावाने दुकाने आणि पोलीस यांच्‍यावर दगडफेक केली. जमावाला नियंत्रणात आणण्‍यासाठी पोलिसांनी दोनवेळा लाठीमार केला. त्‍यानंतर येथे परिस्‍थिती नियंत्रणात आली. रा.स्‍व. संघाचे काही कार्यकर्ते पोलीस अधीक्षकांच्‍या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शेकडो लोक या कार्यालयाकडे जाण्‍याचा प्रयत्न करत होते. ‘जोपर्यंत गुन्‍हेगारांची घरे पाडली जात नाहीत, तोपर्यंत आम्‍ही उपोषण सोडणार नाही’, अशी उपोषणकर्त्‍यांची मागणी आहे. तसेच आरोपींना १२ घंट्यांत अटक न झाल्‍यास बेमुदत बंदची घोषणाही केली आहे.

१. हरि सेवा धामचे महंत महामंडलेश्‍वर हंसराम म्‍हणाले की, समाजकंटकांनी गायीची शेपटी कापून मंदिराबाहेर टाकली आहे. त्‍यांना शहर आणि राज्‍य येथे अशांतता पसरवायची आहे. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही पकडले नाही. प्रशासन हिंदु समाजाला शांत करण्‍यात गुंतले आहे; मात्र आता हिंदु समाज जागा झाला असून या घटनेमुळे संपूर्ण हिंदु समाज एकवटला आहे. जोपर्यंत समाजकंटकांना अटक होत नाही तोपर्यंत भिलवाडा बंद राहील.

२. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प्रांतीय सेवा प्रमुख रवि जाजू यांनी ‘राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या धर्तीवर शांतता प्रस्‍थापित करण्‍यासाठी आरोपींची कायदेशीर आणि बेकायदेशीर मालमत्ता नष्‍ट करावी’, अशी मागणी केली.

संपादकीय भूमिका

राजस्‍थानमध्‍ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्‍य करण्‍याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केला पाहिजे !