Pakistani Girl Transplants Hindu Heart : काफिर इस्लाम स्वीकारत नसल्याने त्याने हृदय दिल्यानंतरही त्याला लाभ नाही ! – पाकिस्तानी इमाम

पाकिस्तानी युवतीला भारतीय हिंदूचे हृदय प्रत्यारोपण केल्यावरून पाकिस्तानी इमामाचे वक्तव्य !

शस्त्रक्रिया झालेली पाकिस्तानी मुलगी व पाकिस्तानी इमाम

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील एका १९ वर्षीय गरीब मुसलमान मुलीवर भारतात नुकतीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. या वेळी एका भारतीय हिंदूचे हृदय तिच्यात शरिरात रोपण करण्यात आले. त्या हिंदूने मृत्यूपूर्वी त्याचे अवयव दान केले होते. या घटनेवरून पाकच्या एका इमामाने म्हटले की, हे हृदय एका काफिराचे आहे. यामुळे अल्लाचा दरवाजा त्या व्यक्तीसाठी उघडणार नाही. हा इमाम पुढे म्हणाला की, काफिराच्या सर्वांत उदात्त कृतीचाही त्याला काही उपयोग होणार नाही. जर एखाद्या मुसलमानाने मुलीला त्याचे हृदय दिले असते, तर अल्लाने त्याची काळजी घेतली असती.

या इमाम पुढे म्हणाला की, जर एखाद्या व्यक्तीने इस्लाम धर्माचे पालन करतांना कोणतेही चांगले काम केले, तर तिला त्याचे चांगले प्रतिफळ मिळते; परंतु काफिरांना कोणत्याही चांगल्या कृतीचे फळ मिळत नाही. त्यामुळे देणगी देणारी व्यक्ती मुसलमान असणे आवश्यक आहे.

भारतियांमध्ये आजही माणुसकी जिवंत ! – एक पाकिस्तानी तरुण

या घटनेवरून एका पाकिस्तानी तरुणाने म्हटले की, अशा लोकांना पाकिस्तानी जनतेच्या मनात विष कालवायचे आहे. भारतियांमध्ये आजही माणुसकी जिवंत आहे, तर आमच्या नेत्यांना भारत आणि पाकिस्तान या सूत्रावरून राजकारण करायचे आहे.

संपादकीय भूमिका

‘हिंदु-मुसलमान ऐक्य’च्या गोष्टी करणार्‍यांच्या तोंडून आता या इमामाच्या वक्तव्याविषयी चकार शब्दही निघणार नाही ! इस्लामचे पुरस्कर्तेही या इमामाला विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !