‘एम्.आय्.एम्.’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी २६ एप्रिल या दिवशी वाराणसी येथील एका प्रचारसभेत उत्तरप्रदेशमधील माफिया मुख्तार अन्सारी याची मुक्तकंठाने स्तुती केली. एवढ्यावर न थांबता मुख्तार अन्सारी हा ‘शहीद’ असल्याची वल्गनाही ओवैसी यांनी केली आणि त्यांच्या या वक्तव्याचे जमलेल्या सहस्रावधी मुसलमानांनी टाळ्या वाजवून समर्थन केले. बॅरिस्टर असल्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. ‘मुख्तार अन्सारी कोण होता ?’, याची त्यांना चांगली माहिती आहे. अनेक हत्यांचे आरोप असलेला आणि उत्तरप्रदेशमध्येच नव्हे, तर अन्य राज्यांतही फौजदारी गुन्हे नोंद असलेल्या या गुन्हेगाराचे त्यानंतरही ओवैसी यांनी समर्थन केले. मुख्तार अन्सारी १८ वर्षांपासून कारागृहात होता. मागील महिन्यात कारागृहात त्याचा मृत्यू झाला. ‘पोलिसांनी विषप्रयोग करून मुख्तार अन्सारी याची हत्या घडवून आणली’, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. ओवैसी यांनाही त्यामध्ये तथ्य वाटत असेल, तर या बॅरिस्टर महोदयांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी न्यायालयामध्ये करायला हवी होती; परंतु तसे करण्याऐवजी ओवैसी मुख्तार अन्सारीसारख्या सैतानाला ‘महात्मा’ म्हणून मुसलमानांपुढे उभे करत आहेत. ओवैसी मतांसाठी करत असलेले हे राजकारण भविष्यात देशासाठी घातक आहेच; परंतु मुसलमान समाजासाठीही ही काही चांगली गोष्ट नाही. आधीच गुन्हेगारी कारवायांमध्ये अग्रेसर असलेल्या मुसलमान समाजाला ओवैसी यांच्यासारखे नेते आणखी रसातळाला नेत आहेत. ‘भविष्यात ही देशासाठी डोकेदुखी होईल’, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अनेकांच्या हत्या करून आणि दरोडे टाकून जहन्नुमचा (नरकाचा) वाटेकरी असलेल्या मुख्तार अन्सारी याला ओवैसी ‘शहीद’ ठरवत असतील, तर असे शहीद आणि त्यांचे समर्थक भारताला पाकिस्तानच्या दिशेने नेतील.
अल्लाने दाखवलेल्या वाटेने जाऊन इस्लामसाठी मृत्यू पत्करलेल्या व्यक्तीला ‘शहीद’ म्हटले जाते. अनेक जणांनी ‘हुतात्मा’ या शब्दासाठी ‘शहीद’ शब्दाचा उपयोग करतात. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणारे क्रांतीकारक आणि देशाचे रक्षण करतांना प्राणत्याग करणारे भारताचे सैनिक यांना काही जण ‘शहीद’ असे संबोधतात. क्रांतीकारक भगतसिंह यांनाही ‘शहीद’ ही उपाधी लावली जाते; पंरतु इस्लामच्या व्याख्येनुसार वरीलपैकी कुणीही ‘शहीद’ नाही. उलट त्यांना ‘शहीद’ म्हणणे म्हणजे त्यांच्या त्यागाचा अपमान होय. ओवैसी यांना ‘शहीद’ आणि ‘हुतात्मा’ यांच्यामधील भेद निश्चितच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी मुख्तार अन्सारी याला इस्लामच्या अर्थानेच ‘शहीद’ म्हटले आहे, यात शंका नाही. स्वराज्यावर चालून आलेले औरंगजेब, अफझलखान आदी धर्मांध हेही मुसलमानांना ‘आलमगिरी’ (जगज्जेता) आणि ‘शहीद’ वाटतात. याचे कारण त्यांनी इस्लामसाठी प्राण दिले, अशी ओवैसी आणि मुसलमान समाजाची धारणा आहे. त्यामुळे यांचा भारताला धोका आहे.
मुसलमानांना मागास ठेवणारे नेते !
मुसलमान आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास राहिले. याचे खापर देशातील बहुसंख्य हिंदूंवर फोडले जाते; पण मुसलमानांचा मागासलेपणा त्यांच्यातील धर्मांधतेमुळे आहे. त्याला कुणी अन्य उत्तरदायी नसून ओवैसी बंधू यांसारखे मुसलमानांचे नेतेच त्याला उत्तरदायी आहेत. ओवैसी यांनी मुख्तार अन्सारी याला ‘शहीद’ म्हणणे म्हणजे त्याने केलेल्या हत्यांचे, गुंडगिरीचे समर्थन करणे होय. अशा व्यक्तीला अल्लाचा बंदा (शहीद) म्हणून ओवैसी यांनी सर्व मुसलमानांना मुख्तार अन्सारी याचा मार्ग चोखाळण्याचा संदेश दिला आहे. मुसलमान आधुनिक शिक्षण घेत नाहीत, म्हणून मदरशांमध्ये कुराणाच्या व्यतिरिक्त अन्य शिक्षण देण्याची योजना सरकारने आणली खरी; पण त्यानंतरही मुसलमानांची धर्मांधता अल्प होत नाही. याचे कारण ओवैसी यांच्यासारखे नेते त्यांचे नेतृत्व करतात. काश्मीरमधील फारूख अब्दुल्ला यांचे घराणे असो किंवा महाराष्ट्रातील अबू आझमी असोत, मुसलमानांच्या या नेत्यांनी मुसलमान समाजापुढे नेहमी धर्मांधतेचा आदर्श ठेवला आहे. नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर हे नेते निवडून येऊ शकत नाहीत. केवळ धर्माच्या नावावरच त्यांची पोळी भाजते. त्यामुळे हिंदूंचे भय दाखवून मुसलमानांची मते मिळवायची, हेच आजपर्यंत या नेत्यांनी केले. मुसलमान समाजाला जोपर्यंत असे नेते लाभले आहेत, तोपर्यंत ‘अल्पसंख्यांक’ म्हणून कितीही सवलती दिल्या तरी मुसलमानांचा विकास शक्य नाही.
केवळ मतांसाठी वापर !
स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस मुसलमानांचा मुखवटा झाली. धर्माच्या नावाने मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळतात, हे लक्षात आल्यावर काँग्रेसने भारतात मुसलमानधार्जिणे राजकारण चालू केले. अनेक वर्षे मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवर काँग्रेसने अनेक उमेदवार निवडून आणले. मतांसाठी मुसलमानांना ‘अल्पसंख्यांक’ ठरवून अनेक सवलतीही दिल्या. स्वातंत्रोत्तर काळानंतर आतापर्यंत मुसलमानांना या सवलती चालूच आहेत; पण इतक्या वर्षांत गुन्हेगारीच्या क्षेत्रात मुसलमानच अग्रेसर आहेत. बलात्कार, अमली पदार्थांची तस्करी, हत्या यांमध्ये युवा मुसलमानांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याविषयी मुसलमानांनी खरोखरच चिंतन करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने मुसलमानांचा वापर करून घेतला हे लक्षात आल्यावर मुसलमान समाजातून ओवैसीसारखे नेते निर्माण झाले. या नेत्यांना खरोखरच मुसलमानांचे हित साधायचे असते, तर त्यांनी मुसलमानांना या गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता; मात्र तेही काँग्रेसप्रमाणे मुसलमानांचा मतांसाठीच वापर करत आहेत. असे नेते मुसलमानांचे हित साधू शकत नाहीत.
धर्मांधता सोडली तर भारतातील अस्तित्व धोक्यात येईल, असे भय मुसलमानांना दाखवले जाते; परंतु हा त्यांचा भ्रम आहे. मुसलमानांच्या कितीतरी टक्क्यांनी अल्पसंख्य असूनही भारतात जैन, पारसी पंथीय आनंदाने आणि गुण्यागोविंदाने रहातात. त्यांना हिंदु करून घेण्याचा विचारही हिंदूंच्या मनाला शिवत नाही. मुळात धर्मांतर किंवा बळजोरी करून धर्म वाढवण्याची शिकवण हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. ओवैसींसारखी नेते मंडळी मुसलमानांना धर्मांधतेकडे नेत आहेत. यामध्ये ना मुसलमानांचे हित आहे, ना भारताचे, हे मुसलमानांनी समजून घ्यायला हवे. थोडक्यात बहुतांश मुसलमानांमधील धर्मांधता ही राष्ट्रीय समस्या आहे. ती निपटण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न होणे आवश्यक !