Human Trafficking RussiaUkraine War : ७ शहरांमध्ये सीबीआयच्या धाडी

रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी केल्याचे प्रकरण

नवी देहली – रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी होत असल्यावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) देशातील देहली, चंडीगड, मुंबई आदी ७ शहरांमध्ये धाडी घातल्या आहेत. यात ५० लाख रोख रक्कम, संशयास्पद कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे आढळल्याची माहिती मिळाली आहे.

या धाडीतून आतापर्यंत ३५ जणांची मानवी तस्करी झाल्याचे अन्वेषण समोर आले आहे. या प्रकरणी सीबीआयकडून काही जणांना कह्यात घेतल्याची माहिती आहे. रशियात नोकरी देण्याचे आमीष दाखवणारी विज्ञापने वर्तमानपत्रांतून प्रसारित करून तरुणांना रशियामध्ये युद्धासाठी पाठवले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.