मिरवणुकीतील गाण्यावर आक्षेप घेत जामा मशिदीजवळ झाले आक्रमण
हजारीबाग (झारखंड) – येथे रामनवमीपूर्वी काढण्यात येणार्या ‘मंगला’ मिरवणुकीवर जामा मशिदीच्या ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर तोडफोडीची घटना घडली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमार करण्यासह हवेत गोळीबारही केला. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हजारीबाग येथे प्रतिवर्षी होळीनंतर आणि रामनवमीपर्यंत प्रत्येक मंगळवारी मिरवणूक निघते. तिला ‘मंगला’ मिरवणूक म्हणतात.
Hindu Procession Attacked by Radical Muslims in Hazaribagh (Jharkhand)
Attack occured near the Jama Masjid over objections to Procession Music
It is no coincidence that Hindu religious processions are frequently attacked near mosques. Given this pattern, it has become necessary… pic.twitter.com/6Mn9IvxAWG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2025
१. मंगला मिरवणुकीच्या वेळी आखाड्यातील लोक ढोल वाजवत मिरवणूक काढत होते. मिरवणुकीत काही गाणी वाजवली जात होती. ही मिरवणूक जामा मशिदीजवळ पोचल्यावर मुसलमानांनी या गाण्यांवर आक्षेप घेतला आणि वाद घातला. यानंतर त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्याला हिंदूंकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.
२. दगडफेकीनंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की, पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते शांत होण्यास सिद्ध नव्हते. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे दिसून आले, तेव्हा पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
३. हिंदूंचे म्हणणे आहे की, त्यांची मिरवणूक शांततेत होती; परंतु धर्मांधांनी जाणूनबुजून वातावरण बिघडवले.
४. हजारीबागच्या पोलीस उपायुक्त नॅन्सी सहाय म्हणाल्या की, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मिरवणुकीत गाणे वाजवण्याच्या निषेधार्थ ही घटना घडली.
५. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन यांच्या साहाय्याने गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे काम चालू केले आहे.
संपादकीय भूमिका
|