हिंदु संघटनांकडून ‘भिलवाडा बंद’चे आवाहन
भिलवाडा (राजस्थान) – येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आदर्श हा ‘हिंदु जागरण मंच’शी संबंधित होता. या घटनेनंतर विश्व हिंदु परिषद, भाजप आणि हिंदु जागरण मंच यांनी ११ मे या दिवशी ‘भिलवाडा बंद’चे आवाहन केले होते. या वेळी हिंदु संघटनांकडून दुचाकी फेरी काढण्यात आली होती. या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे इंटरनेट सेवा २४ घंट्यांसाठी बंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना कह्यात घेतले आहे. या हत्येमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
Rajasthan: Tensions prevail in Bhilwara after a Hindu boy is killed by members of another community, BJP calls for bandhhttps://t.co/DFcgRO6V0g
— OpIndia.com (@OpIndia_com) May 11, 2022
१. विश्व हिंदु परिषदेचे गणेश प्रजापत म्हणाले की, भिलवाडामध्ये वारंवार जातीय घटना घडत आहेत. तरुणाच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देण्यात यावे आणि सर्व आरोपींना अटक केली जावी. जोपर्यंत आरोपींना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत आदर्श याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.
२. भाजपचे आमदार विठ्ठल अवस्थी म्हणाले की, ही अत्यंत लाजिरवाणी आणि पोलीस अन् सरकार यांना झोपेतून जागे करणारी घटना आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसशासित राजस्थानमध्ये गेल्या १-२ मासांपासून हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. हे पहाता राजस्थान दुसरे काश्मीर होत आहे का ? असा प्रश्न कुणाला पडल्यास आश्चर्य वाटू नये ! |