सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कतार आणि तुर्कस्तान यांना आमंत्रण

प्रातिनिधिक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आता नियंत्रण मिळवल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने ‘पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल’, असे सांगितले आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना स्वीकार होईल, असे सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे’, असे तो म्हणाला. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानने रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कतार आणि तुर्कस्तान या देशांना आमंत्रित केले आहे. या देशांनी यापूर्वीच तालिबानशी संपर्क साधला आहे.  रशिया, चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी अफगाणिस्तानातील त्यांचे दूतावास बंद केलेले नाहीत.