अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख !

अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती श्यामला देशमुख !

श्रीमती श्यामला देशमुख

१. श्री. दिनेश शिंदे यांनी साधिकेची आई आश्रमात नसूनही उत्साही असणे, ती करत असलेले साधनेचे प्रयत्न जाणून घेण्यास सांगणे

‘माझी आई श्रीमती श्यामला देशमुख २१ ते २७ जानेवारी २०१७ या कालावधीत रामनाथी आश्रमात आली होती. येथील पुष्कळ साधकांंशी तिची जवळीकही झाली. आश्रमातील साधक श्री. दिनेश शिंदे यांनी मला विचारले, ‘‘आई आश्रमात रहात नाही. ती घरीच असते, तरी ती एवढी उत्साही कशी ? तिच्यावर रज-तमाचे आवरण असल्याचे अजिबात जाणवत नाही. ती काय प्रयत्न करते, हे तिला विचार.’’

सौ. सावित्री इचलकरंजीकर

२. दिवसांतून पुष्कळ वेळा अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे अन् मनाकडे लक्ष देणे

त्याप्रमाणे मी आईला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी कापूर आणि अत्तर यांचा दिवसातून पुष्कळ वेळा सुगंध घेते. त्या सुगंधाच्या माध्यमातून मला चैतन्य मिळते. आपले मन महत्त्वाचे आहे. त्याकडे लक्ष द्यायचे.’’ हे उत्तर ऐकून मला तिच्यातील भोळ्या भावाचा प्रत्यय आला.

३. संतांनी केलेले कौतुक

३ अ. पू. संदीप आळशी

३ अ १. आईचा तोंडवळा पूर्वीपेक्षा सात्त्विक वाटणे : आई आणि पू. संदीप आळशी यांची भेट झाल्यावर त्यांनी तिचा तोंडवळा पूर्वीपेक्षा सात्त्विक वाटत असल्याचे सांगितले.

३ आ. एक संत

३ आ १. प्रगती चांगली होत असून पटपट पुढे जात आहात ! : एका संतांशी आईची भेट झाल्यावर ते तिला म्हणाले, ‘‘प्रगती चांगली होत आहे. पटपट पुढे जात आहात. तुमच्या सहज बोलण्यातूनही इतरांना पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’’

३ आ २. अंतर्मुख कसे रहायचे, हे आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणे आणि सनातन संस्थेत हे एकमेव उदाहरण असणे : संतांनी नंतर मला विचारले, ‘‘आई तिच्या प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटते. केवळ तेवढेच नाही, तर बोलतांनाही तिच्या मनाचा पुष्कळ उत्साह जाणवतो. ती काय प्रयत्न करते ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘ती तिच्या मनाच्या स्थितीकडे अधिक लक्ष देते आणि अंतर्मुख रहाण्याचा प्रयत्न करते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही साधक अंतर्मुखता म्हणजे काय, हे केवळ शिकतात. कृतीत आणत नाहीत; पण आईने अंतर्मुख कसं रहायचं, हे शिकून ते आत्मसात केलं. आपल्याकडे असे एकमेव उदाहरण आहे.’’

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (श्रीमती श्यामला देशमुख यांची मुलगी), सनातन आश्रम, गोवा. (६.२.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक