
‘वर्ष २००८ मध्ये एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ‘तुझे वय काय ?’ , असे विचारले. मी त्यांना ‘३० वर्षे’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू वयस्कर दिसतोस. ‘तुझे वय जास्त असेल’, असे मला वाटले.’’ त्यानंतर २ मासांनी माझी त्यांच्याशी पुन्हा भेट झाली. तेव्हा त्यांनी मला पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि मी त्यांना तेच उत्तर दिले. तेव्हा ते आश्चऱ्याने म्हणाले, ‘‘अरे, तू खूपच तरुण दिसतोस. ‘तुझे वय अल्प आहे’, असे मला वाटले.’’ क्षणभर थांबून मी त्यांना जिज्ञासेने विचारले, ‘‘मागील वेळी ‘मी वयस्कर दिसतो’, असे आपण म्हणाला होता आणि आता ‘वयाच्या मानाने तरुण दिसतोस’, असे सांगितले.’’ तेव्हा ते पटकन म्हणाले, ‘‘हं, त्रासदायक शक्तीचे आवरण असेल, तर वयस्कर दिसतोस आणि आवरण नसेल, तर तरुण दिसतोस.’’

या प्रसंगातून त्यांनी त्रासदायक शक्तीचे आवरण नियमित काढण्याचे आणि साधनारत असण्याचे महत्त्व माझ्या मनावर ठसवले, तसेच ‘स्थूल गोष्टीमागील सूक्ष्मातील कार्यकारणभाव काय असतो ?’, हेही शिकवले. अध्यात्मातील अनेक पैलू अत्यंत सहजसुलभतेने उलगडून सांगून साधनारत रहाण्यासाठी प्रोत्साहित करणार्या गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (६.३.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |