(म्हणे) ‘तक्षशिला विश्‍वविद्यालय प्राचीन पाकिस्तानचा भाग !’

  • पाकच्या राजदूतांचा जावईशोध !

  • पाणिनी आणि चाणक्य यांनाही पाकिस्तानचे सुपुत्र ठरवले !

खोटेपणाचा कहर करणारे पाकिस्तानचे अधिकारी ! जर तक्षशिला ‘प्राचीन पाकिस्तान’ असेल, तर पाकने हे मान्य करावे की, त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ते बाटलेले मुसलमान आहेत ! त्यांचा इतिहास इतका महान आहे, तर त्यांनी महान हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करावा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे व्हिएतनामचे राजदूत असल्याचे सांगणारे कमर अब्बास खोखर यांनी प्राचीन भारताचा आदर्श असणार्‍या तक्षशिला विश्‍वविद्यालयाचे चित्र ट्विटरवरून पोस्ट (प्रसारित) करून त्याला ‘प्राचीन पाकिस्तान’ असे म्हणत ट्वीट केले आहे. यानंतर त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून प्रचंड प्रमाणात टीका होत आहे.

१. खोखर यांनी तक्षशिला विश्‍वविद्यालयाच्या चित्रावर ट्वीट करतांना म्हटले की, हे तक्षशिला विश्‍वविद्यालयाचे आकाशातून दिसणारे दृश्य आहे, जे पुन्हा एकदा रेखाटण्यात आले आहे. हे विश्‍वविद्यालय प्राचीन पाकिस्तानमध्ये २ सहस्र ७०० वर्षांपूर्वी इस्लामाबादजवळ होते. येथे जगभरातील १६ देशांतील विद्यार्थी ६४ वेगवेगळ्या विषयांमध्ये उच्चशिक्षण घेत होते. त्यामध्ये प्राचीन भाषातज्ञ पाणिनीसारखे विद्वान शिकवत होते. पाणिनी आणि चाणक्य दोघेही प्राचीन पाकिस्ताचे सुपुत्र होते.

२. यानंतर खोखर यांच्या विरोधात ट्विटरवरून विरोध करण्यात आला आहे. यासाठी हॅशटॅगही करण्यात आला आहे. ‘१४ ऑगस्ट १९४७ पूर्वी पाकिस्तान अस्तित्वातच नव्हता, तर तो प्राचीन कसा असेल ? इस्लामच १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी आला आहे. तक्षशिलाच २ सहस्र ७०० वर्षांची आहे’, अशा प्रकारच्या टीका यात करण्यात आल्या आहेत.