तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

कोल्हापूर – स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता. किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० लाख रुपये घोषित केले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यासाठी केलेली विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.