महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

‘चेन्नई येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ३१ ऑक्टोबर २०२० या दिवशी सप्तर्षि जीवनाडीचे वाचन केले. या वेळी महर्षींनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. महर्षींच्या आज्ञेनुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

या जीवनाडीमध्ये महर्षि पुढे सांगतात, ‘‘सनातन संस्थेचे तीन गुरु असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिघांना आम्ही आशीर्वाद देतो. आम्ही साधकांना आज सांगू इच्छितो की, श्रीमहाविष्णु, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती यांच्या चरणांवर डोके ठेवल्याने जे फळ मिळते, तेच फळ साधकांना सनातनच्या तीन गुरूंना नमस्कार केल्यावर मिळते.

रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर डावीकडून ‘सुदर्शन यंत्र’, ‘ॐ’ आणि ‘श्रीयंत्र’ यांच्या आकारात लावण्यात आलेले दिवे
श्री. विनायक शानभाग

१. वर्ष २०२० ची दीपावली सनातन संस्थेसाठी आनंदाची दीपावली आहे. यादिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात दीपोत्सव साजरा करायचा आहे.  रामनाथी आश्रमात जेथे जेथे प्रवेशद्वार आहेत, त्या त्या ठिकाणी तीन गुरूंसाठी प्रत्येकी ७ तेलाचे दीप लावावे. असे २१ दीप होतील.

२. तीन गुरूंसाठी रामनाथी आश्रमात आणि अन्य आश्रमांमध्ये विशेष आकारात दीप लावायचे आहे. त्या दिव्यांची रचना पुढीलप्रमाणे करावी –

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभिवृद्धीसाठी ‘ॐ’ च्या आकारात दिवे लावावेत.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अभिवृद्धीसाठी ‘सुदर्शन यंत्रा’च्या आकारात दिवे लावावेत.

२ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अभिवृद्धीसाठी ‘श्रीयंत्रा’च्या आकारात दिवे लावावेत. ‘श्रीयंत्रा’मधील ५१ बिंदू हे देवीच्या ५१ शक्तिपिठांशी संबंधित आहेत.

दीपावलीनिमित्त होणारा ‘दीपोत्सव’ सनातन संस्थेसाठी विजयाचा दीपोत्सव आहे. हे पाहून सर्व साधकांनाही पुष्कळ आनंद होणार आहे.’’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई. (११.११.२०२०)