२८.३.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मनुष्याचा स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित नाड्या असतात याविषयी ज्ञानमय उत्तर जाणून घेतले. आज त्यापुढील भाग दिला आहे.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897047.html

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह आणि आत्मा यांसह बाहेर पडतो. प्राणदेहातील काही शक्ती शरिरातून उत्सर्जित होते, तर काही शक्ती त्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासासाठी वापरली जाते. अशा वेळी सप्तचक्रे आणि त्यांच्याशी संबंधित नाड्या यांचे काय होते ? त्यातील शक्तीचे काय होते ?

उत्तर : व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या देहातील सप्तचक्रे आणि इडा, पिंगला अन् सुषुम्ना या तिन्ही कुंडलिनीनाड्या अकार्यरत होऊन सुप्तावस्थेत जाऊन त्यांची बीजे व्यक्तीच्या लिंगदेहात संक्रमित होतात आणि त्यांची शक्ती सुप्तावस्थेत साठून रहाते.
२ अ. सप्तचक्रांची नावे आणि त्यांचे लिंगदेहातील स्थित असणारे स्थान
२ आ. कुंडलिनीनाड्या आणि त्यांचे लिंगदेहातील स्थान
२ इ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी (टक्के), तिच्या साधनेची स्थिती, तिच्या लिंगदेहामध्ये सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांच्यावर होणारा परिणाम आणि तिच्या लिंगदेहावर होणारा परिणाम : जर व्यक्ती साधना करणारी नसेल, तर तिच्या लिंगदेहामध्ये सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांची बीजे अकार्यरत स्थितीत रहातात. व्यक्तीने तिच्या जिवंतपणी साधना केली असेल, तर तिच्या मृत्यूनंतर सप्तचक्रे आणि कुंडलिनीनाड्या यांची स्थिती पुढीलप्रमाणे असते.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४) (क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898418.html
|