जगाच्या पाठीवर कुठूनही भक्तगण गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू शकणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.

दिवसातून एक घंटा योगासाठी द्या ! – योगऋषी रामदेवबाबा

गोव्यातील सर्व समुद्रकिनारे योगमय व्हावेत, तसेच सर्वांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमांतून सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योगऋषी रामदेवबाबा, ‘पतंजलि योग समिती’ आणि कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांचा प्रयत्न आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.

लोकांना रोग आणि रोगांवरील औषधे यांमधून मुक्ती देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. योगऋषी रामदेवबाबा यांचे सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन !

नाशिक येथे २०० साधकांकडून १०८ सूर्यनमस्‍कार !

सातपूर येथील मुक्‍ती महिला संस्‍था आणि श्रीराम फाऊंडेशन यांच्‍या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘सूर्याथॉन-२०२३’चे आयोजन करण्‍यात आले होते.

खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !

श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे !

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहित केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

#Ayurved # आयुर्वेद : रोग टाळण्यासाठी योगाभ्यास करा !

‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’