आरोग्यम् धनसंपदा ।
‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ सोडून आणि सर्व विषयांबद्दलची आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने समाजकार्य किंवा भगवद्भक्ती करावी.
पूर्वापार चालत येणार्या आपल्या संस्कृती अनेक जण विसरतात; पण त्यामागे काही कारणे असतात. डोळ्यांत काजळ घालणे (अंजन) ही त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कृती.
आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.
येणाऱ्या आपत्काळाच्या दृष्टीने पुढील आयुर्वेदीय वनौषधींची लागवड करा !
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. त्यांचा समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.
‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’
योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणाऱ्यांना सकाळी अधिक पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते.