‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचा वचकही गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे !

भारतातील बांगलादेशाच्या राजनैतिक अधिकार्‍याला बांगलादेशाने माघारी बोलावले !

बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद सानियुल कादर याला महिलांना अश्‍लील संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याच्या प्रकरणी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमध्ये बोलावून घेतले आहे.

पाटण (गुजरात) येथे विवाहित महिलेने विवाह करण्यास नकार दिल्यावर धर्मांधाकडून तिच्यावर आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलेवर आक्रमण करण्याचे धाडस होणे अपेक्षित नाही, असे हिंदूंना वाटते !

‘शक्ती’ कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती !

‘शक्ती’ कायद्याखालील महिला आणि बालक यांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० यावरील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

मध्यप्रदेशातील जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधिशांची वरिष्ठांकडून लैंगिक छळ झाल्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका !

महिला न्यायाधिशांच्या आरोपात तथ्य असेल आणि न्यायाधीश जर वासनांध असतील, तर हे प्रकरण पुष्कळ गंभीर आहे. ‘असे न्यायाधीश पीडित महिलांचे खटले कशा प्रकारे हाताळत असतील’, असा विचार सामान्य जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ?

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार !

काँग्रेसचे अध्यक्षपद एका महिलेकडे आहे, उत्तरप्रदेशातील प्रमुखपद महिलेकडे आहे. असे असतांना पक्षामध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ?

देहलीमध्ये प्रजासत्ताकदिनी मुलीचे अहपरण करून सामूहिक बलात्कार

भारताच्या सामाजिक अधोगतीचेच हे दर्शक आहे. या आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून अशांना फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

सातारा येथे विवाहितेचा छळ करून हत्या !

विवाहित महिलांवरील अत्याचार चालूच रहाणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. कुटुंबव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी संस्कार आणि धर्मशिक्षण आवश्यक !

खासदार नवनीत राणा यांच्या ‘ऑडिओ क्लिप’विषयी महिला आयोगाने मागितला खुलासा !

या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने त्यांना दिले आहेत.