‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

अरबाजने ‘विशाल’ बनून अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार !

अश्लील चित्रफित बनवून धर्मांतर करण्यासाठी दबाव !

केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचा वचकही गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक

खांडवा (मध्यप्रदेश) – येथील अरबाज याने ‘विशाल’ या हिंदु नावाने १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर त्याने मित्रासह तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची चित्रफीत बनवून धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव टाकला. या प्रकरणी खांडवा पोलिसांनी अरबाजचा मित्र सादिक याला अटक केली आहे. सध्या अरबाज पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायदा आणि अन्य कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

१. हरसूद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या एका गावातील १५ वर्षांची पीडिता १०वी ची विद्यार्थिनी आहे. ३ मासांपूर्वी सावली गावाच्या खानशाहवली येथील अरबाज याने ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून ‘विशाल’ नावाने पीडितेशी मैत्री केली. पीडितेशी परिचय वाढवल्यानंतर अरबाज याने पीडितेला लग्न करण्यासाठी खांडवा येथे बोलावले.

२. अरबाजला भेटण्यासाठी पीडिता १८ जानेवारी २०२२ या दिवशी घरून लग्नाचे कपडे आणि आभूषणे घेऊन खांडवा येथे गेली. त्याने तिला जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या एका सरकारी निवासस्थानी ठेवले. तेथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला तो ‘विशाल’ नसून धर्मांध अरबाज असल्याचे समजले. तेव्हा तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला तेथेच बंधक बनवण्यात आले.


इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केला बलात्कार !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील अहमद फैज याने ‘अमन’ नाव धारण करून येथे कंपनी सेक्रेटरी (सीएस् – सचिव)चे शिक्षण घेणार्‍या एका २४ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीला फसवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती बनवून तिला ‘ब्लॅकमेल’ केले. या प्रकरणी शिकारपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडितेने सांगितले की, ती शिक्षण घेत असतांना एका उपाहारगृहामध्ये नोकरी करत असे. त्या वेळी तिची ‘अमन’शी ओळख झाली. त्याच्या हाताला लाल दोरा बांधलेला असायचा आणि तो पूजाही करत होता. त्यामुळे तो मुसलमान असल्याचे तिला २ वर्षे समजले नाही. या काळात त्याने तिला विश्वासात घेऊन तिचे शारीरिक शोषणही केले, तसेच अहमदने तिला अमली पदार्थ सेवन करायला लावून तिच्यावर बलात्कार केला होता.


लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे जारा खान बनलेल्या शिवा विश्वकर्मा हिची धर्मांध पतीकडून हत्या !

कथित सर्वधर्मसमभावापायी अशा किती हिंदु मुलींचे आयुष्य नष्ट होणार आहे ? हे थांबवण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलींना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पारा येथील कांशीराम कॉलनीमध्ये महंमद यासीन याने त्याची पत्नी जारा खान उपाख्य शिवा विश्वकर्मा हिची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलीला सदनिकेच्या बाहेर रडत ठेवून पलायन केले. घटनेच्या दिवशी जाराने दूरभाष उचलला नाही; म्हणून तिचा भाऊ तिच्या घरी पोचला होता. त्याने सदनिकेचे दार उघडून पाहिल्यावर त्याला त्याची बहीण मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे त्यानेच ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जारा खान उपाख्य शिवा विश्वकर्मा ही यासीनची दुसरी पत्नी होती. शिवा विश्वकर्मा हिने धर्मांतर केल्यानंतर यासीनशी लग्न केले होते.

२. बहराईचच्या नानपारा येथे रहाणारा यासीन आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीचे काम करायचा. यासीनची पहिली पत्नी शाहबानो बहराईचमध्ये रहाते. ती काही दिवसांपूर्वी मुलासमवेत येथे रहायला आली होती. पोलीस तिचीही चौकशी करत आहेत.


खांडवा (मध्यप्रदेश) येथील तरुणीवर महाराष्ट्रात धर्मांधाकडून अत्याचार

तरुणीने लग्न करण्यासाठी धर्मांतर करण्याची अट नाकारली !

सध्या ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना चिंतेचा विषय आहे. त्याला रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

खांडवा (मध्यप्रदेश) – महाराष्ट्रातील अंजनगाव सुर्जी (जिल्हा अमरावती) येथील दानिश याने खांडवा (मध्यप्रदेश) येथील हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला खांडवा येथून आणून तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार केला. धर्मांधाच्या कुटुंबियांनी लग्न करण्यासाठी पीडितेला धर्मांतर करण्याची अट घातली. तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला खांडवा रेल्वेस्थानकावर सोडून पळ काढला.

या प्रकरणी पीडितेने खालवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे.