देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

पोलिसांनी गुन्हा नोंदवूनही २ मास करवाई करण्यात आली नसल्याचा महिला पत्रकाराचा आरोप

एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असतांना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले देहली पोलीस निष्क्रीयता कशी काय दाखवतात ? या हिंदु महिला पत्रकाराला न्याय दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

नवी देहली – येथील प्रीत विहारमधील ‘न्यूज ॲक्शन नेटवर्क’ या ‘यू ट्यूब चॅनल’च्या माजी महिला पत्रकाराने चॅनलचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक शान चौधरी यांच्यावर ‘इस्लाम पंथ स्वीकारल्यास वेतनात २५ सहस्रांहून १ लाख रुपये अशी वाढ करू’, असे आमीष दाखवल्याचा आरोप केला आहे.

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

या महिला पत्रकाराने व्हिडिओमध्ये म्हटले की, मला शान चौधरी मुसलमान मुलीसारखे दिसण्यासाठी दबाव निर्माण करत होता. याला कंटाळून मी नोकरी सोडली. माझे राहिलेले वेतन घेण्यासाठी शान याने बोलावल्यावर मी गेले असता तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.