कीर्तनकारांनी सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्यावर टीका करू नये !

कीर्तनकारांनी भावनेच्या भरात सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्याविषयी टीका करू नये, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी वर्धा येथील विणेकरी केशव कोलते ठरले मानाचे वारकरी !

चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्‍यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती द्या ! – वारकरी आणि भाविक यांचे निवेदन

सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सातारा पोलिसांकडून जिल्ह्यातील अनेक वारकरी आणि युवक यांची धरपकड !

संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यासाठी ७ जुलै या दिवशी जिल्ह्यातील वारकरी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार होते;

‘पंढरपूर वारीसाठी मी माघार घेत आहे’, असे सांगण्यासाठी पोलीस प्रशासनाचा माझ्यावर दबाव होता ! – संतवीर बंडातात्या कराडकर

मी देवपूजा केल्याविना पाणीही पित नाही. हे वारंवार पोलिसांना सांगूनही त्यांनी मला देवपूजा करू दिली नाही. माझ्या जागी उच्च रक्तदाब आणि साखर यांचा रुग्ण असता, तर तो निश्चित दगावला असता.

मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान !

कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी यांच्या नियमांचे पालन करून मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान वीणा मंडपातून आजोळघरी झाले.

पंढरपूरच्या आषाढी वारीला बेळगाव जिल्ह्यातील वारकर्‍यांनी जाऊ नये ! – एम्.जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी, बेळगाव

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी ११ ते २४ जुलै या कालावधीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणार्‍या पंढरपूर येथील वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील वारकर्‍यांना बंदी घातली आहे.

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.

संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश

पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्‍यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन करणार्‍या संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.