समुद्राची पातळी वाढू लागल्याने मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आदी शहरांना मोठा धोका !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !

संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांनी तालिबानच्या झेंड्यासह काढली छायाचित्रे

संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी व्यक्त केली चिंता !

नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !

अब्दुल रहमान मक्की हा ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानी जिहादी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केले. मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा मेहुणा आहे.

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांत म्यानमारमधील हिंसक कारवाया थांबवण्याविषयी ठराव संमत

म्यानमारमधील हिंसाचार त्वरित थांबवावा आणि म्यानमारच्या सैन्याने राष्ट्राध्यक्ष विन मिंट आणि आंग सान स्यू की यांच्यासह सर्व मनमानीपणे कह्यात घेतलेल्या कैद्यांची तात्काळ सुटका करावी, असे आवाहन या प्रस्तावामध्ये केले आहे.

तुमच्या मागे साप दिसला, तर तो शेजार्‍यालाच नाही, तर तुम्हालाही दंश करील !

जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.

ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य करणार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नये !

आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पुन्हा पाठिंबा !

जागतिक स्तरावर भारत आणि ब्राझिल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांचा स्थायी सदस्य म्हणून परिषदेत समावेश करण्याविषयी विचार व्हायला हवा. 

राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे ‘चांगले किंवा वाईट’, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे !

आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.