सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

भारतीय महिला सैनिकांची तुकडी

अबयेई (सुदान) – संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत सुदानच्या अबयेई भागात तैनात होण्यासाठी केवळ महिलांचा समावेश असणारी भारताची एक सैन्य तुकडी गेली आहे. यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे. अबयेई हा भाग जगातील सर्वाधिक अशांत क्षेत्र समजला जातो. येथे ४ जानेवारी या दिवशी २०० लोकांच्या जमावाने एका गावामध्ये आक्रमण करून १३ लोकांना ठार केले.

यापूर्वी आफ्रिका खंडातील लायबेरिया देशात वर्ष २००७ मध्ये भारतीय महिला सैनिकांच्या एका तुकडीला अशाच प्रकारे तैनात करण्यात आले होते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. यामुळे तेथील महिलांचा उत्साह वाढला होता.