राज्यातील पोलीसदलात १२ सहस्र ५०० जागा भरण्यास मंत्रीमंडळाची मान्यता ! – शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री

पोलिसांची पुरेशी भरती न केल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढून त्यांना आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक पोलिसांचा मृत्यूही झाला आहे.

महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा अपमान चालू असून वारकर्‍यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात ! – ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर

ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे रहित केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही.

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा मिरज येथे प्रारंभ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून हे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम आता केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शासकीय महापूजेचे निमंत्रण !

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन देण्यात आले.

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याविषयी ‘टास्क फोर्स’ समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर !

पहिल्या टप्प्यात उपाहारगृहे उघडण्यासाठी सवलती घोषित केल्या जाणार आहेत. उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली जाणार आहे, तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने आमदार रवि राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कान्होपात्राचे रोपटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात लावण्यात येणार !

पुरातन झाड वठल्याने त्या जागी नवीन कान्होपात्राचे झाड लावण्याची सिद्धता मंदिर समितीने केली असून आषाढी एकादशीला हे झाड कान्होपात्राच्या समाधी समोर लावण्यासाठी समितीने कट्टा सिद्ध करून घेतला आहे.

कोयनानगर येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याविषयी प्रस्ताव सिद्ध करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.