अशोक चव्हाण यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे ! – आमदार विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष

आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा युवकांनी बलीदान दिले आहे. काँग्रेसेचे नेते अशोक चव्हाण यांना याची जाण असेल, तर त्यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली

तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण सांगता येणार नाही !

२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते.

पुस्तके घरपोच वितरण करण्यास परवानगी द्या ! – मराठी प्रकाशक संघाची मागणी

केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा आणि दळणवळण बंदीच्या काळात पुस्तकांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १५ मेपर्यंत वाढ

राज्यात ३० एप्रिलपर्यंत असलेली दळणवळण बंदी १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. २८ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील ३ दिवसांत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न्यून होत आहे.

महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि ‘रेमडेसिविर’ यांचा आवश्यक तो पुरवठा व्हावा ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तसेच ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा आवश्यक आहे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहकार्य करा ! – नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

दळणवळण बंदीच्या काळात गतवर्षी आणि आतासुद्धा जीव धोक्यात घालून राबणार्‍या माथाडी कामगारांविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना आर्थिक सहकार्य द्यावे

विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….

अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक येथील दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित

राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांचा बंदोबस्त करावा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.