
सोलापूर, १६ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रूक्मिणी यांच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे; शिवसेना सचिव विनायक राऊत (भाई); मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर; शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे; समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर; समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी; पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शिवसेना संपर्क प्रमुख संतोष माने आदी उपस्थित होते.
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
२५ जुलै : देवशयनी एकादशी
पंढरीचा महिमा !