नोकरीत आरक्षण दिल्यावर पदोन्नतीत आरक्षण देऊ नये ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

पत्रात अजय सिंह सेंगर यांनी लिहिले आहे की, जातीवर आधारित विषमतानामक कीड नष्ट करणे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक जातीसाठी वेगवेगळा न्याय आणि कायदा प्रणाली भविष्यात यादवी (गृहयुद्ध) निर्माण करू शकते.

सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्षी ३३ लाख ५० सहस्र रुपयांचा आर्थिक बोजा

राज्य आर्थिक संकटात असतांना वैयक्तिक गोष्टींवर सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशांची उधळपट्टी करणे अपेक्षित नाही. सरकारी तिजोरीत अशा प्रकारे कुठेकुठे अनावश्यक व्यय होत आहे का ? याचा अभ्यास करून सरकारने हा व्यय थांबवावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणार्‍यांना पोलिसांनी घेतले कह्यात !

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अल्प पडल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात संभाजीनगर येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम संघटना

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रहित करून जवळपास १५ दिवस झाले.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे हानी झालेल्यांना लवकरच साहाय्य घोषित करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत, ते योग्य ते साहाय्य करतील ! – मुख्यमंत्री ठाकरे

साहाय्यापासून कुणीही वंचित रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकार्‍यांशी साधला ‘ऑनलाईन’ संवाद !

नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.

राज्यात विविध ठिकाणी चक्रीवादळाचा फटका, ११ जणांचा मृत्यू !

वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता. राज्यातील सहस्रावधी बांधकामांची पडझड ! जहाजात अडकलेल्या १३७ प्रवाशांना सुरक्षित हालवले ! ‘मुंबई हाय’जवळ ओ.एन्.जी.सी. कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; ९६ जण बेपत्ता !

‘फॅमिली डॉक्टर’ लढाईत उतरले, तर कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार करू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘फॅमिली डॉक्टरां’नी शासनासमवेत यावे. कुटुंबप्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य आपण उचलावे. तुम्ही लढाईत उतरलात, तर कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.