मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !

वर्ष २०१५ मध्ये मालवणीमधील लक्ष्मीनगर येथे मद्य पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जणांना अपंगत्व आले होते. हे मद्य विषारी असल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते.

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !

‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.

Dhar Bhojshala Survey : भोजशाळेविषयी सर्वेक्षणाला इंदूर उच्च न्यायालयाकडून २ महिने मुदतवाढ !

न्यायालयाने पुरातत्व विभागाला भोजशाळेच्या सर्वेक्षणाविषयी अंतिम अहवाल ४ जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे.

Kejriwal Lust For Power : केजरीवाल यांच्या अटकेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये !

केजरीवाल सत्तेच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपद अजूनही सोडत नाही, हे लज्जास्पद आहे. देहलीच्या जनतेनेच आता केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यासाठी दबाव आणला पाहिजे !

पीअर रिव्ह्यू, जी.एस्.टी. संदर्भात रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने मार्गदर्शन सत्र

सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे ? याबद्दल मार्गदर्शन केले.

वक्फ बोर्डाचा ‘हॉटेल मॅरियट’वरील दावा तेलंगाणा उच्च न्यायालयाने फेटाळला !

आसुरी ‘वक्फ कायदा १९९५’च्या आडून भारताचे इस्लामिस्तान करण्याचा घाट कशा प्रकारे घातला जात आहे, याचे हे एक उदाहरण ! त्यामुळे आता वक्फ कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

आदमापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील संत बाळूमामा देवस्थानाचे मानद अध्यक्ष आणि अन्य विश्वस्त दोषमुक्त !

पुढील आदेश येईपर्यंत निरीक्षक रागिणी खडके या देवस्थानाच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पहाणार आहेत. यातील सगळी कागदपत्रेही विश्वस्तांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !

असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्‍या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?

मुख्यमंत्री केजरीवाल यांना केवळ सत्तेची भूक ! – देहली उच्च न्यायालय

मद्य धोरण प्रकरणात अटक होऊनही त्यागपत्र न देता अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय हितापेक्षा व्यक्तीगत हितालाच प्राधान्य दिले आहे, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना फटकारले.