स्वारगेट (पुणे) बलात्कार प्रकरण

पुणे – स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये प्रसारमाध्यमांसह इतर ठिकाणी केली जात आहेत. अशा वक्तव्यांमुळे पीडित तरुणीवर मानसिक परिणाम होत आहे. न्यायालयाने याविषयी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, अशी विनंती अधिवक्ता असीम सरोदे यांनी ३ मार्च या दिवशी न्यायालयाकडे केली आहे.
आरोपीच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात पीडित तरुणीविषयी काही चुकीची वक्तव्ये केली. प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणी चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केली जात आहेत. वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, चुकीची वक्तव्ये होऊ नयेत, अशी विनंती पीडितेचे अधिवक्ता सरोदे यांनी केली आहे.
स्वारगेट आगारात निषेधासाठी महिलांकडून ‘तिरडी आंदोलन’ !
पुणे – स्वारगेट येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘महिला जागर समिती’ने महिला सुरक्षिततेची तिरडी काढून निषेध आंदोलन केले. भाजप सरकारने लाडक्या बहिणींना एकवेळ १ सहस्र ५०० रुपये दिले नाहीत तरी चालेल; पण त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, अशा शब्दांत ‘गुलाबी गँग’च्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी बलात्कार घटनेचा निषेध व्यक्त केला.
संपादकीय भूमिका :समाज आणि वृत्तपत्रे यांना याचे भान नसणे अन् त्यांना प्रतिबंध करावा लागणे, हे संतापजनक ! अशी वृत्तपत्रे असून नसल्यासारखीच आहेत ! |