High Court On Sambhal Case : उच्च न्यायालयाकडून संभल येथील शाही मशिदीचा उल्लेख आता ‘वादग्रस्त इमारत’ असा होणार !

संभल (उत्तरप्रदेश) येथील वादग्रस्त इमारत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – संभल येथील श्री हरिहर मंदिरावर बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांना त्यांच्या आदेशात मशिदीऐवजी ‘वादग्रस्त इमारत’ असा शब्द वापरण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत न्यायालयीन कर्मचार्‍यांना ‘मशीद’ ऐवजी ‘वादग्रस्त इमारत’ असा शब्द वापरण्याचा आदेश दिला.  याआधीही उच्च न्यायालयाने पू. जैन यांच्या विनंतीनंतर लेखी आदेशात मशिदीऐवजी ‘कथित मशीद’ असा शब्द वापरला होता.

संभलची ही वादग्रस्त इमारत रमझानच्या काळात रंगवण्यासाठी अनुमती मागणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. या प्रकरणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालाची नोंद घेत उच्च न्यायालयाने केवळ इमारतीची स्वच्छता करण्यास अनुमती दिली होती.