अमृतसर (पंजाब) येथील गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवला शस्त्रसाठा !

हँड ग्रेनेड, १०० हून अधिक काडतुसे आणि ‘टिफीन बॉम्ब’ सापडला !
पाकचे ड्रोन भारतीय सीमेत घुसतातच कसे ?

देहलीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

गेली ३ दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन आतंकवादाच्या सावटाखालीच भारताला साजरे करावे लागत आहेत, हे अतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

देहली आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा इ-मेल अल् कायदाच्या एका आतंकवाद्याकडून प्राप्त झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि तंज्ञत्रान साहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न करणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा १ मासासाठी बनला अध्यक्ष !

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा एक मासासाठी अध्यक्ष बनला आहे. याविषयी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारत त्याच्या कार्यकाळामध्ये निष्पक्ष राहून योग्य निर्णय घेईल, अशी आशा आहे.

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावरील गोळीबारात सुरक्षारक्षक ठार

अफगाण सैन्यासमवेत चालू असलेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षारक्षकाला गोळी लागली असू शकते.

जम्मूमधील मंदिरांवर आक्रमण करण्याचे जिहादी आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

अभद्र युती !

भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !

जे चीन बोलू शकतो, ते भारताला इतकी वर्षे का बोलता आले नाही ? भारतातील आतंकवाद नष्ट न करता येणारा भारत असे बोलत नाही, यात आश्चर्य ते काय !

पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.