आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि तंज्ञत्रान साहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न करणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असणार्‍या भारताचे सूतोवाच !

उजवीकडे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले. भारत या परिषदेचा ऑगस्ट मासासाठी अध्यक्ष झाला आहे, तर वर्ष २०२१-२२ या काळात अस्थायी सदस्यही आहे. सदस्य देशांना एकेक मासासाठी अध्यक्षपद मिळत असते.

संयुक्त राष्ट्रांतील कार्यक्रमांविषयी तिरुमूर्ती यांनी सांगितले की, सागरी सुरक्षा, आतंकवादाचा सामना आणि शांततारक्षण यांना प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान मोदी हे ‘सागरी सुरक्षे’वर ९ ऑगस्टला होणार्‍या चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील. परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर हे १८ ऑगस्टला ‘शांततारक्षण आणि तंत्रज्ञान’ यांवर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. १९ ऑगस्टला जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुट्रेस यांच्या इसिसवरील (इस्लामिक स्टेट म्हणजेच इस्लामचे राज्य) अहवालाविषयीच्या चर्चेतही सहभागी होणार आहेत.