जम्मूमधील मंदिरांवर आक्रमण करण्याचे जिहादी आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्यात आल्याच्या घटनेला येत्या ५ ऑगस्ट या दिवशी २ वर्षे होणार आहेत. त्यानिमित्ताने आणि १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच गर्दीच्या ठिकाणी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटना बॉम्बस्फोट करून आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. यानंतर पोलिसांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. ‘आतंकवाद्यांकडून आक्रमणासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येण्याची शक्यता असल्याने ड्रोनविरोधी रणनीती आखण्यात येत आहे’, असे पोलिसांनी सांगितले.