तालिबानी आतंकवाद्यांनी चीनमध्ये जाऊन घेतली परराष्ट्रमंत्र्यांची भेट !
तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील तालिबानी आतंकवाद्यांचा गट मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये गेला आहे. तेथे या आतंकवाद्यांच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. मुल्ला बरादर याने चीनला, ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या सुरक्षेच्या विरोधात होऊ देणार नाही’, असे विधान चीनला उद्देशून केले. या भेटीच्या काही दिवसांपूर्वी पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि आय.एस्.आय.चे प्रमुख फैज हामिद यांनी चीनमध्ये जाऊन वांग यी यांची भेट घेतली होती. (पुढे चीन, पाक आणि तालिबान यांनी एकत्र येऊन भारतविरोधी कारवाया केल्याचे समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)
१. तालिबानने चीनच्या शिंजियांग प्रांताशी सीमा असणार्या अर्ध्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवले आहे. ‘तालिबानी शिंजियांग प्रांतामध्ये घुसखोरी करून तेथील उघूर मुसलमानांना साहाय्य करील’, अशी चीनला भीती वाटत आहे.
२. चीनने तालिबानी आतंकवाद्यांना, ‘तालिबान्यांनी सर्व आतंकवादी संघटनांशी असलेले संबंध संपुष्टात आणावेत’, असे स्पष्टपणे सांगितले. यात अल् कायदा पुरस्कृत उघूर मुसलमानांची बंडखोर संघटना इ.टी.आय.एम्. (इस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट) हिचाही समावेश आहे. ही संघटना शिंजियांग प्रांताला स्वतंत्र करण्यासाठी लढत आहेत.
Taliban leader visits #China for talks with Foreign Minister Wang Yi. The delegation from the #Afghanistan group met Wang in Tianjin, sources say. Talks come as the insurgency group’s control of Afghanistan reaches its border with the Chinese region of Xinjiang
Source: SCMP pic.twitter.com/eBM8wGBWcJ
— WION (@WIONews) July 28, 2021
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !