अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावरील गोळीबारात सुरक्षारक्षक ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सुरक्षारक्षक ठार झाला.

काबुल (अफगाणिस्तान) – हेरात प्रांतात असणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सुरक्षारक्षक ठार झाला. ‘या आक्रमणामागे तालिबान आहे का’, याविषयी अजून दुजोरा मिळालेला नाही.

याविषयी  तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने ट्वीट करून म्हटले की, अफगाण सैन्यासमवेत चालू असलेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षारक्षकाला गोळी लागली असू शकते.