नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी कर आकारणीद्वारे खर्चाचे प्रावधान करणे क्रमप्राप्त !
निवडणूक आली की, प्रत्येक वेळी केवळ गोरगरिबांच्या नावाने गळा काढून कर माफ केले जातात आणि त्याचा भुर्दंड महापालिकेच्या सेवांवर पडतो. परिणामी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा अन् इतर सेवा महापालिका नागरिकांना देऊ शकत नाही.