कतार विश्वविद्यालयातील ‘इस्लाम’चे प्राध्यापक डॉ. शफी अल् हजरी यांचे विधान !
दोहा (कतार) – कतार विश्वविद्यालयातील ‘इस्लाम’ विषयाचे प्राध्यापक डॉ. शफी अल् हजरी यांनी कतारमधील ‘अल् रेयान टीव्ही’ या वाहिनीवर एका कार्यक्रमात देशातील मुसलमानेतरांकडून कर वसूल करण्याचे समर्थन केले. तसेच त्यांनी मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आणण्यासाठी ३ टप्प्यांमध्ये प्रयत्न करण्यास सांगितले.
‘First, ask them to convert, then make them pay Jizya tax, if they refuse, fight them’: Qatari professor Dr Shafi Al-Hajrihttps://t.co/P3JIsR5wCl
— OpIndia.com (@OpIndia_com) December 2, 2022
शेवटच्या टप्प्यांत तलवारीच्या बळावर इस्लामचा प्रसार केला पाहिजे, असे त्यांनी सांतिले. प्रा.डॉ. शफी अल् हजरी यांनी म्हटले की, पहिल्या टप्प्यामध्ये मुसलमानेतरांना प्रेमाने इस्लाम स्वीकारण्यास सांगितले पाहिजे. त्यांना त्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. जर ते ऐकत नसतील, तर त्यांच्यावर जिझिया कर लादला पाहिजे आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास बाध्य केले पाहिजे. तरीही ते इस्लामचा स्वीकार करत नसतील, तर त्यांच्याशी शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध केले पाहिजे. तलवारीच्या बळावर इस्लामचा प्रसार करणे योग्य आहे, असे त्यांनी म्हटले.
संपादकीय भूमिका
|