गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांना पथकरामधून सूट !

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून कोकणात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही सूट देण्यात येईल. पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी. त्यानंतर त्यांना टोलमधून सूट देण्यात आल्याचे स्टिकर देण्यात येतील, अशी माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.