सोलापूर – नागरिकांनी महापालिकेचा कर ३० नोव्हेंबरपूर्वी भरावा. यानंतर थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागास आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. सोलापूर महापालिकेचा अनुमाने ६०० कोटी रुपयांहून अधिक कर थकित आहे. ३० नोव्हेंबरनंतर थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे मिळकतदारांनी थकित रक्कम भरावी, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची थकबाकी का रहाते ? वेळच्या वेळी कर वसूल का केला जात नाही ? यासाठी महापालिकेवर कुणाचा अंकुश नाही का ? |