तालिबानचे ‘मोस्ट वॉन्टेड’ मंत्रीमंडळ !

‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नवीन सरकारची सूत्रे हातात घेतली आहेत. तालिबानच्या हंगामी सरकारला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हटले पाहिजे; कारण या सरकारमध्ये आतंकवाद्यांकडेच मंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यातील बहुतांश आतंकवादी पूर्वी सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका यांच्याशी लढले आहेत. त्यांनी अनेक लढाया केल्या, क्रूर कृत्ये केली आणि आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाकडून जावेद अख्तर यांना नोटीस !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात ठाणे येथील न्यायालयामध्ये खटला प्रविष्ट्र केला आहे. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा चालू करावी ! – तालिबान सरकारची भारताकडे मागणी

भारत सरकारने ही मागणी मान्य करू नये, असेच प्रत्येक भारतियाला वाटते !

केरळमध्ये तालिबानी समर्थकांमध्ये होत आहे वाढ ! – माकपच्या अंतर्गत पत्रकामध्ये उल्लेख

केरळमध्ये धर्मांधांची मते मिळवून माकप सत्तेत आला आहे. त्यामुळे तालिबानी समर्थकांची संख्या वाढत आहे, अशा आशयाची अंतर्गत पत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन माकपवाले काहीही करणार नाहीत.

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनाचा निषेध !’ – तालिबान

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. याविषयी तालिबानने नाक खुपसायची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताने फुटकळ तालिबानला फटकारले पाहिजे.

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

मुसलमानांना कधीच न विसरणार्‍या ममता बॅनर्जी !

‘बंगाल भारताचे रक्षण करील. त्याला ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही; कारण ही रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे.’

जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

रा.स्व. संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता ध्रुतीमन जोशी यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला.

तालिबानचे सरकार आणि जागतिक घडामोडी !

आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याच्या आधीच भारताने त्यांचे तळ कायमचे नष्ट करावेत !

तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादाचा मृत्यू, तर मुल्ला बरादर ओलीस !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड संघर्ष चालू झाला आहे.