तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादाचा मृत्यू, तर मुल्ला बरादर ओलीस !

तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये संघर्ष !

डावीकडून मुल्ला बरादर आणि हैबतुल्ला अखुंदजादा

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड संघर्ष चालू झाला आहे. या संघर्षातूनच हक्कानी नेटवर्ककडून तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा याला ठार करण्यात आले आहे, तर तालिबान सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला बरादर याला ओलीस ठेवण्यात आल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द स्पेक्टेटर’ने दिले आहे. याला अद्याप तालिबानकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात ही घटना घडल्याचे म्हटले गेले आहे.