न्यायालयाकडून जावेद अख्तर यांना नोटीस !

रा.स्व.संघाची तुलना तालिबानशी केल्याचे प्रकरण

जावेद अख्तर

ठाणे, २९ सप्टेंबर (वार्ता.) – प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान अन् राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी आता न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात ठाणे येथील न्यायालयामध्ये खटला प्रविष्ट्र केला आहे. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे.