जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याचे प्रकरण

गीतकार जावेद अख्तर

मुंबई – रा.स्व. संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता ध्रुतीमन जोशी यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रतिमा डागाळण्यासाठी असे वक्तव्य केल्याचे अधिवक्ता ध्रुतीमन जोशी यांनी त्यांच्या दाव्यात म्हटले आहे. याच प्रकरणी अधिवक्ता संतोष दुबे यांनीही जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.